मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू असताना जीएसटी, शेतकऱ्यांचे प्रश्न यावरून सत्ताधारी आणि विरोधीपक्षात चांगलाच शाब्दिक वाद पाहायला मिळाले. केंद्राने वस्तुंवरील जीएसटी कमी करावा अशी मागणी देखील विरोधी पक्षाकडून यावेळी करण्यात आली. या बरोबरच ‘काळी दाढी अन् पांढरी दाढी’ यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी चांगलीच टोलेबाजी केली.
“धनंजय मुंडेंची सगळी लफडी माहितीय, त्यामुळे त्याला आम्हाला गद्दार म्हणायचं अधिकार आहे का?”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही मुख्यमंत्री झाला हे पाहुन मला आनंद झाला, पण मला आनंद होण्यामागे कारण वेगळेच आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. पण त्यामध्येही सफेद दाढी आणि काळी दाढी असा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच आहे पण सफेद दाढीचा प्रभाव हिंदुस्तानावर आहे, असं भुजबळ यांनी म्हणत केंद्र सरकारवर टोला लगावला. तर उपमुख्यमंत्री यांनी आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा खुप सन्मान होतो असा टोला भुजबळ यांना लगावला.
“शिवसेना भवनासमोर शिवसेनेकडून निष्ठा दहीहंडीचे आयोजन”
माजी मंत्री छगन भुजबळ जीएसटीच्या मुद्द्यावरून बोलत होते ते म्हणाले की, जीएसटाच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट सुरू आहे. एक गोष्ट जीएसटीतुन सुटलेली नाही. नशीब आमच्यावर पण जीएसटी लावला नाही. याचा सर्वसामान्य नागरिकांवर फार वाईट परिणाम होत आहे, असं म्हणाले. सोबतच स्कुल चले हम जीएसटीके साथ अशी घोषणाही भुजबळ यांनी दिली.
“अजित पवारांनी स्वत: च्या काकांसोबत गद्दारी केली, त्यावेळी नारेबाजी का केली नाही?”
केंद्र सरकारने जीएसटीत खुप वाढ केली आहे. संकलन वाढलं आहे. जीएसटी परिषदेत सगळ्या राज्याचे लोक असतात मानतो, पण गेल्या काही दिवसांत बातम्या आल्या की अनेक अन्नधान्याच्या आणि जीवनावश्यक वस्तूंवर देखील केंद्राने जीएसटी लावला आहे. याचा फटका प्रत्येक मानसाला बसतो आहे, अशी चिंता देखील व्यक्त केली.
Read also
- “आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
- “फडणवीसांचा ‘सागर बंगला’ हा वॉशिंग मशीनचं काम करत आहे”
- 50-50 चलो गुवाहटी..गद्दारांना ताट-वाटी..चलो गुवाहाटी; सलग दुसऱ्या दिवशीही विरोधकांची घोषणाबाजी
- “तुम्ही हजार कोटी घेतलेत, ते घेत असताना तुम्ही नामर्द होते का?” अन् बचू कडू संतापले
- “संजय राऊतांच्या संबंधित आणखी 3 ठिकाणी इडीचा छापा”; महत्त्वाची कागदपत्रे जप्त