छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर सध्या हे शहर चर्चेत आलं आहे. आज रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली असून दगडफेक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनंतर राज्यात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या पाठीमागे भाजप, एमआयएम आणि शिंदे गट असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
हेही वाचा…“आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाची आत्महत्या, भाजपला संशय, मनसुख हिरेन २.० असल्याचा दावा”
अंबादास दानवे म्हणाले की, मागच्या एक महिन्यापासून या शहरात हिंदू, मुस्लिम असा विष पेरण्याचा प्रयत्न चालु आहे. एमआयएम सारखी मुस्लिम संघटना रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत आंदोलन करत आहे. यावर पोलीस आयुक्त काय भूमिका घेत आहे? त्यांना उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाकडून रॅली, मोर्चे काढले जातात. काढल्या पाहिजेत. परंतु अशा रॅलींना पोलीसांची परवानगी नसलेल्या यादीत महाराष्ट्राचे मंत्री देखील सहभागी होते.
हेही वाचा…“साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं”, गिरीश बापटांच्या निधाननंतर चंद्रकांत पाटील भावूक
महाराष्ट्रातील मंत्र्यांना याची काहीच जाण नाही आहे. त्यातच आम्ही शहारांच्या आयुक्तांना आम्ही वारंवार दंगल घडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं निर्दशनात आणून दिलं होतं. बी बाब आम्ही राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर दोनदा बोललो आहे. परंतु शहाराचे आयुक्त दोन्ही बाजूंच्या लोकांना गोड बोलून ते प्रकरण सहज मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये पोलिस आयुक्तांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. असंही दानवे म्हणाले.
हेही वाचा…“मंत्रीपद अन् पालकमंत्रीपदावरून तानाजी सावंत नाराज, शिंदे गटात आलबेल नाही”?
दरम्यान, पोलिसांवर देखील हल्ले केले जात आहे. हे कितपत योग्य आहे. त्यामुळे जे कुणी पोलिसांवर हल्ले करीत त्यांचे हातपाय तोडले पाहिजे. तसेच आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी एमआयएम, भाजप आणि शिंदे गट दंगली घडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असा आरोपही अंबादास दानवे यांनी लावला आहे.
Read also
हेही वाचा…पुण्याचा नवा खासदार कोण ? भाजपमध्ये अनेकांची नावं चर्चेत, पोटनिवडणुक बिनविरोध की थेट लढत ?
हेही वाचा…“गिरीश बापट गेले, भाजप-शिवसेना युती टिकवण्यासाठी त्यांचे मनापासून प्रयत्न होते “, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“ठाकरे गटाचे आणखी दोन खासदार भाजपच्या संपर्कात,” केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा… संजय राऊतांना कोर्टाचा मोठा दणका, ‘इतक्या’ रूपयांचा ठोठवला दंड
हेही वाचा…“आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर सोडून, आरोग्यमंत्री स्वत:चीच पाठ थोपटण्यात व्यस्त”