मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणुक चिन्ह गोठवल्याने उद्धव ठाकरेंना याचा मोठा धक्का बसला. तसेच यावरून आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. यातच बंडखोर आमदार आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत सचिवाला शिवीगाळ केल्यामुळे ते सध्या चर्चेत आले आहेत.
“सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड घेत होते”; राहुल गांधींचं खळबळजनक वक्तव्य
काल वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्या या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं सांगण्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केली. आपलं काम पुर्ण न झाल्याने सत्तार यांनी खतगावकरांना खडे बोल सुनावले. त्यानंतर आमदार आणि खासदारांनी त्यांची समजूत काढली. या संपुर्ण वादानंतर सत्तार बैठकीला न थांबता निघून गेले.
अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
अब्दुल सत्तार यांच्या अशा वर्तवणुकीनंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पीएला कॅबिनेट मंत्र्यांची शिवीगाळ. करमणुक चालू राहिली पाहिजे. कधी गाणे, कधी नकला, कधी मेळावे, कधी शिवीगाळ आणि कधी मारामाऱ्या. एवढं विनोदी सरकार महाराष्ट्रात कधीच आलं नव्हतं. विनोदी कलाकार आहेत की मंत्री ? असा खोचक टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी लगावला आहे.
अंधेरीची जागा शिवसेनेची आहे, तरी शिंदे गटाचा भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यास अधिक रस
दरम्यान, निवडणुक आयोगाने चिन्ह आणि नाव गोठवल्याने उद्धव ठाकरे यांनी निवडणुक आयोगाला नाव आणि चिन्ह सुचवलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन नावांचा पर्याय निवडणुक आयोगाला सादर केला आहेत. तर त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल अशी चिन्ह निवडणुक चिन्ह देखील ठाकरेंनी सुचवली आहेत.
Read also
- “नेताजी अतिशय दिलदार अन् मोठ्या अंत: करणाचे होते”; सुळेंनी मुलायम सिंह यांना वाहली भावपूर्ण श्रंद्धाजली
- “….तर आपण आगामी निवडणुकीत १०० आमदार निवडून आणू शकतो”
- “बाळासाहेबांनी हिंदू म्हणण्याची हिमंत तुम्ही गोठवली”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
- समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यांचं निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- पिंपरी-चिंचवडमध्ये आज ‘हाय होल्टेज पॉलिटिकल डे’