IMPIMP

मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला

eknath shinde vs devendra fadanvis

धाराशिव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मोठा धक्का दिला आहे. भाजपा नेते, आदर्श शिक्षण प्रचारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. सुधीर पाटील यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. वर्षा येथील निवासस्थानी झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या वेळी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचा..मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील ‘हा’ भाजपचा आमदार अडचणीत 

१९८८ साली वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून दोनदा विधानसभा निवडणूक लढवली. तर २००९ साली त्यांनी लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली होती. त्यांच्या येण्याने धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न अधिक परिणामकारकरित्या सोडवता येतील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्यक्त केलाय.

हेही वाचा..महाविकास आघाडीत बिनसलं..! रोहित पवारांनी बारामतीला निघून जावं, कर्जत जामखेडची जागा कॉंग्रेसला सोडा 

सुधीर पाटील हे कळंब धाराशिव मतदारंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. धाराशिव आणि तुळजापुर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यातच त्यांनी २०१७ साली शिवसेना पक्षाला राम राम ठोकून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता कळंब विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आता राजकी वर्तुळात सुरू झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील” 

हेही वाचा..माढ्यात दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात झुंजणार ? शरद पवारांची मोठी खेळी 

हेही वाचा..“एक तर तु राहशील, नाहीतर मी राहीन”, उद्धव ठाकरे संतापले, कुणाला दिला इशारा ? 

हेही वाचा..“मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच”, भाजपची ठाकरेंवर जहरी टिका

हेही वाचा…उमेदवारीसाठी हडपसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अन् शिवसेनेत संघर्ष ; भाजपने दावा सोडला ? 

 

 

Total
0
Shares
Previous Article
_Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray

"देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील"

Next Article
amol mitkari with chitra wagh

"राज्यातलं वातावरण खराब करण्यासाठी चित्रा वाघ, मिटकरींना सुपारी..!"

Related Posts
Total
0
Share