मुंबई: जुलै महिन्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे जीवितहानीसह मोठे नुकसान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर येणार असून, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहे. कोकण, कोल्हापूर येथील पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा आहे.
हे पण वाचा: तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली
कोल्हापूर, सांगलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. तसेच, येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहेत.
हे पण वाचा: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही” – भाजप
मुख्यमंत्र्याचा असा असणार आहे सांगली दौऱ्या
मुख्यमंत्री सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण. सकाळी ८.५५ वा. छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन. सकाळी ९ वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी ९.५० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी ९.५५ वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण. सकाळी १०.५५ वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. सकाळी ११.०५ वा. मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण. सकाळी ११.१० वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.
हे पण वाचा: भाजपमधील भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला फारसा वेळ लागणार नाही – विनायक राऊत
सकाळी ११.२० वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण, ११.५५ वा. कसबे डिग्रज जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी ११.०५ वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा -सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.१० वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी १२.२० वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.३० वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी १२.४० वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १२.४५ वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.
हे पण वाचा: भाजप नेत्याला सत्तेचा माज चढलायं, राज्यघटना पाण्यात बुडवण्याची भाषा चुकीची – दिपाली धुमाळ संतापल्या
दुपारी १२.५५ वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. दुपारी १ वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. दुपारी १.४५ वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण. दुपारी १.५० वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी २.१५ वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी ३.३० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन, दुपारी ३.३५ वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.
Read Also :
- “स्वबळाचा नारा हा आमचा हक्क, आम्ही देखील स्वबळाचा नारा देवू”- मुख्यमंत्री
- तुम्ही बैठकीला बोलवा, आम्ही लगेच येवू; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा सविस्तर…
- कुणी थप्पड देण्याची भाषा करु नका, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही – उद्धव ठाकरे
- पुण्यात रस्त्यांची चाळण, ठेकेदाराच्या कामावर महापालिकेचे नियंत्रणच राहिले नाही; विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ
- तु फक्त निवडणुक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील, तुला गाडतील; भाजप आमदारावर शिवसेना खवळली