जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. यातच काल विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर टिका केल्यानंतर चित्रा वाघ यांनी देखील त्यांच्यावर पलटवार केला आहे. यातूनच आता शरद पवार गटातील महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांचे कान टोचले आहेत. तसेच राज्यातील वातावरण खराब करण्यासाठी चित्रा वाघ, अमोल मिटकरी यांना सुपारी देण्यात आली आहे का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…उमेदवारीसाठी हडपसरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अन् शिवसेनेत संघर्ष ; भाजपने दावा सोडला ?
सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांना विरोधी पक्षातल्या लोकांवरती टिका करण्याची सुपारी दिली आहे. कारण नसतांनाही कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. सध्या चित्रा वाघ या सगळ्या नेत्यांवर सुपारी दिल्यासारख्या बोलत सुटल्या आहेत. महाराष्ट्रातलं वातावरण चिघळण्यासाठी त्यांना सरकारने किंवा त्यांच्या नेत्यांनी सांगितलं आहे की काय ? असा मला वाटत आहे. चित्रा वाघ या सत्ताधारी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु त्या उगागच दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहेत. असा टोलाही रोहिणी खडसे यांनी लगावला आहे.
हेही वाचा..मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात, पुण्यातील ‘हा’ भाजपचा आमदार अडचणीत
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, आज महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही ठिकाणी महिलांचे खून देखील होत आहेत. अशा वेळेस महिलांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम चित्रा वाघ यांनी केलं पाहिजे होतं. कारण चित्रा वाघ या एका सत्ताधारी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. एकमेकांवरती चिखल फेक करण्यापेक्षा या महिलांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल. यासाठी चित्रा वाघ यांनी वेळ दिला तर सर्व महाराष्ट्र तुमचं अभिनंदन करेल. पण आज तुम्ही चिखल फेक करण्यामध्ये धन्यता मानतात. असंही त्या म्हणाल्या.
अमोल मिटकरी प्रकरणावर देखील रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सत्ताधारी पक्षातीलच नेते कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांवर टिका करतांना भान ठेवायला हवं. राज्यातील सामाजिक सलोखा यामुळे बिघडणार नाही. यामध्ये कुठल्याही वाईट घटना घडणार नाही. याची सगळ्यांनी काळजी घेणे अपेक्षित आहेत. परंतु काही लोकांना वातावरण खराब करण्यासाठी सुपारी दिली आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला
हेही वाचा..“देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपविण्यासाठी ठाकरेंना शंभर जन्म घ्यावे लागतील”
हेही वाचा..माढ्यात दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात झुंजणार ? शरद पवारांची मोठी खेळी
हेही वाचा..“एक तर तु राहशील, नाहीतर मी राहीन”, उद्धव ठाकरे संतापले, कुणाला दिला इशारा ?
हेही वाचा..“मराठा आरक्षणाचे खरे कट्टर विरोधक उद्धव ठाकरेच”, भाजपची ठाकरेंवर जहरी टिका