No Result
View All Result
पुणे : आमदार निलेश लंके यांच्यावर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपानंतर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत लंकेंवर आरोप केले होते. त्यांनतर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा या दोन नेत्यांत सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले असून, शेख यांनी दिलेले आव्हान, चित्रा वाघ यांनी, “मलाही तुमच्यातला दम पाहायचंय,” असा म्हणत स्वीकारलं आहे.
नगरमध्ये एका कार्यक्रमात वाघ यांनी केलेल्या लंकेवरच्या आरोपाला उत्तर देताना शेख यांनी, “चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते. कर नाही त्याला डर कशाला? तुमच्या नवऱ्याची पण नार्को करा,” असं आव्हान दिलं होतं. त्यावर, “माझ्या नवऱ्याची नार्को टेस्ट करायला तयार आहे. गुन्ह्यात अडकलेला मेहबूब माझ्यावर ‘वाघावर’ भुंकतोय, पण मी वाघ आहे. कोल्हाकुत्र्यांना घाबरत नाही. मलाही तुमच्यातला दम बघायचा आहे,” असं प्रतिआव्हान त्यांनी दिलं आहे.
“जो मेहबूब शेख आज आरोप करतोय. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा आहे. त्याने आधी ३७६ चा गुन्हा काय असतो, याची माहिती घ्यावी. त्याने मुलीवर अत्याचार केला आहे. ते मुलीने काय, कसं, कुठं घडलं हे सगळं सांगितलं आहे. त्यावर मी आवाज उठवला तर हा आज माझ्यावर भुंकतोय आणि आव्हान देतोय, नवऱ्याची नार्को टेस्ट करा! अरे जा रे जा, त्या टेस्टला आम्ही तयार आहोत,” असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
तसेच, “मुख्यमंत्री साहेब, ज्या पक्षाकडे तु्म्ही गृहखातं दिलं आहे. त्या पक्षाच्या अशा कार्यकर्त्यांना, नेत्यांना, आमदारांना आणि मेहबूबसारख्या बलात्काऱ्यांना कधीही उठा, काहीही करा, याची मुभा दिलीय का? ही साहेबांची राष्ट्रवादी नाही! हा लंकेच्या सभेत मला आव्हान देतो. तो लंके जो महिला तहसीलदाराला अट्रोसिटीच्या धमक्या देतो. अरे जा रे जा, मी वाघ आहे आणि ती कशी, हे तुमच्या बापाला जाऊन विचारा,” असा पुनरुच्चार करत त्यांनी जोरदार हल्ला शेख यांच्यावर चढवला आहे.
No Result
View All Result