राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल झाल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्यावर मागील 8 दिवसांपासून सिंहगड रोडवरील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तथापि, उपचार घेऊनही प्रकृती सुधारणा झाली नसल्याने रुबी हॉल क्लीनिकमध्ये दाखल झाल्या आहेत.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. ‘माझी मैत्रिण जुनी सहकारी रुपाली चाकणकर हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचे समजले. लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिचं परमेश्वराकडे प्रार्थना’. अस ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून चित्रा वाघ यांनी भाजपशी हातमिळवणी केली. त्यामुळे रुपाली चाकणकर आणि चित्र वाघ यांच्या अनेक वेळा शाब्दिक चकमकी झाल्या. मात्र एकाच पक्षात असताना या दोन्ही नेत्यांमध्ये चांगली मैत्री होती. त्या मैत्रीपोटी आणि माणुसकी म्हणून चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे.
माझी मैत्रिण जुनी सहकारी @ChakankarSpeaks हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचे समजले. लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिचं परमेश्वराकडे प्रार्थना….🙏 pic.twitter.com/oitPlAv5oq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 19, 2020