पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
हे पण वाचा: पंचनाम्याअभावी मदतीचा अंतिम निर्णय नाही, तूर्तास पूरग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत
राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही.
हे पण वाचा: ‘पेगॅसस’ प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण, देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, सामनातून केंद्र सरकारला सवाल
मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.
हे पण वाचा: भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा
राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती
राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याला जबाबदार राज्य सरकारचा ढिसाळ कारभर आहे, असे म्हणाले.
Read Also :
- राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यात पूर परिस्थिती – राज ठाकरे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात, देश सुरक्षित नाही; संजय राऊत यांची टीका
- राज्यातील लॉकडाऊन उठवण्याबाबत,आज मंत्री मंडळात निर्णय होण्याची शक्यता
- राज्य सरकारच्या परवानगीनेच फोन टॅपिंग, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा कोर्टात दावा
- कार्यकर्त्यांची भावनिक हाक, पंकजा मुंडेंनी शिवसेनेत जावे, पक्षात मुंडेना खडसेंसारखी वागणूक