पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात आढावा बैठक घेताना दिसतात. परंतु “मुख्यमंत्री ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत” अशी तक्रार भाजपकडून सातत्याने होत आहे
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे दौऱ्याला निघण्याची चिन्हं आहेत. पुण्यात ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री आढावा बैठक घेण्याचेही संकेत मिळत आहेत
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात चर्चा करण्याची चिन्हं आहे. ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला मुख्यमंत्री भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.