इंस्टाग्रामवर विजदुर्ग किल्ल्याच्या पडझडीच्या फोटोची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या आहेत.
#Instagram वरील #विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीच्या वृत्ताची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली दखल. केंद्रातील @ASIGoI कडे किल्ल्याच्या डागडुजी व देखभालीसाठी पावले उचलण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या सूचना. pic.twitter.com/GvFocFKlt7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 18, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. त्यांनी चित्रित केलेल्या छायाचित्रांचा ‘महाराष्ट्र देशा’ हा संग्रह वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. या छायाचित्रकार असल्यामुळे इंस्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावरील त्यातही गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात.
मुख्यमंत्र्यांना आज इंस्टाग्रामवर विजयदुर्गच्या बुरुजाची पडझड झाल्याचा फोटो पाहिल्यानंतर याची दखल त्यांनी त्वरित पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत.