मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत यावेळी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित असतील. सकाळीच उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत ‘मातोश्री’हून पुण्याला निघाले आहेत.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा ते बैठकीत घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विभागीय आयुक्तालयात जाऊन पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर निशाणा साधला असून, मुख्यमंत्र्यांचा पुणे दौरा हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची बोचरी टीका पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.