मुंबई : मुंबईतील साकीनाका मध्ये अमानुष अत्याचाराला सामोरे जावं लागलेल्या पीडितेवर, घटनेनंतर तीन दिवस मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अतिरक्तस्त्रावामुळे तिची प्रकृती अतिशय चिंताजनक होती. मात्र ११ सप्टेंबरला तिची प्राणज्योत मालवली. यांनतर राज्यात संतापाचा एकचं आगडोंब उसळला. दरम्यान, यांनतर आज मुख्यमंत्र्यांनी, ‘पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही,’ अशी ग्वाही अनुसूचित जाती आयोगाच्या शिष्टमंडळाला दिली.
साकीनाका बलात्कार प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
या आयोगाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी, ‘पीडित महिलेच्या मुलांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या परिवाराला महिला बाल कल्याण विभागाच्या मनोधैर्य योजनेतून, तसेच सामाजिक न्याय विभागाच्या अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आर्थिक सहाय्य तातडीने दिले जाईल. या महिलेच्या मुलांच्या शिक्षण व पालन पोषण, संगोपनाच्या बाबतीतही संबंधित विभागांना वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या उपाध्यक्षांना सांगितले.
मन सुन्न! नराधमांना फाशीच झाली पाहिजे – देवेंद्र फडणवीस
यावेळी, मुख्यमंत्र्यांनी आयोगाचे उपाध्यक्ष हलदार यांना सांगितले, ‘ज्या निराश्रित व अनाथ महिला रस्त्यांवर राहतात. त्यांच्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार मिळून घरकूल योजना सुरू करता येते का, यासंदर्भात विचार सुरु आहे. आता आयोगाने अशा स्वरुपाची योजना आखण्याविषयी केंद्राला सूचना करावी,’ अशी मागणी त्यांनी केली. तर, ‘अवघ्या काही वेळात पोलिसांनी धाव घेतली, महिलेला मदत केली, वेगाने तपास करुन आरोपीला अटक केली, याविषयी हलदार यांनी समाधान व्यक्त केले.
साकीनाका बलात्कार: पीडितेच्या कुटूंबीयाला २० लाखाची मदत, अॅट्रोसिटीचा गुन्हाही दाखल
दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती . यावेळी, विशेष सरकारी अभियोक्ता यांचा खटला न्यायालयात उभा राहण्याअगोदरच त्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले होते. त्यानुसार प्रसिध्द वकील राजा ठाकरे यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुख्य सचिव सिताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते.
Read Also :
- मोठी बातमी: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे ५ ऑक्टोंबरला मतदान, निवडणुक आयोगाची घोषणा
- ‘पक्षात नेते कमी अन् कारभारीच जास्त,’ राष्ट्रवादीला नेत्यानेच दिला घरचा आहेर
- ‘इतरांच्या पोरांकडे बोट दाखवताना तुमचा मुलगा काय करतो ते पाहा,’ मलिकांचा घणाघात
- मुश्रीफ ठोकणार सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा, पाटील-घाटगेंनाही दिला इशारा
- अनिल देशमुखांचा ठावठिकाणा लागावा म्हणून ईडीने उचलले मोठे पाऊल