फिल्म आणि टीव्हीची प्रोड्युसर एकता कपूरच्या विरोधात अमृतसरमध्ये याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
एकता कापुर सध्या तिच्या वेब सीरिज xxx 2 मुळं चर्चेत आहे. या सीरिजच्या काही सीन्समध्ये भारतीय सैन्याचा अपनमान केला असल्याचं बोललं जात आहे. यात अनेक आक्षेपार्ह सीन्सही आहेत. हे सगळं सांगत हिंदुस्तानी भाऊनं काही दिवसांपूर्वीच मुंबईत यासंदर्भात पोलिसात तक्रार केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा ही सीरिज आणि एकता कपूर वादात सापडली आहे.
एकता कपूरसह तिचे वडिल जितेंद्र आणि आई शोभा कपूर यांच्या विरोधात अमृतसरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. फेमस पंजाबी सिंगर बलजीत सिंग यानं ही याचिका दाखल केली आहे.
एकतानं xxx 2 या सीरिजमध्ये भारतीय सैन्याचा अपमान केला आहे. एकता तिच्या मालिका आणि वेब सीरिजच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अश्लीलता पसरवत आहे असा आरोप बलजीतनं केला आहे. बलजीत सिंग यानं बालाजी प्रॉडक्शनचं नाव बदलण्याचीही मागणी केली आहे. बालाजी नावाच्या बॅनरखाली एकता अश्लीलता पसरवत आहे. हे समाजाविरोधी आहे. इतकंच नाही हिंदू संघटनांनी एकताविरोधात आवाज उठवावा असं आवाहनंही त्यानं केलं आहे.