पुणे : पुण्यातील मनसेचे फायरब्रॅन्ड नेते आणि नगरसेवक वसंत मोरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशातील चर्चांना ऊत आल्याने आता मनसेला गळती लागते की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच पुण्यातील काही बड्या पदाधिकाऱ्यांनी देखील वसंत मोरेंनी भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर नाव न घेता टीका केली आहे.
राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाढव्याला हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी धरून जर मुस्लिम समाज मशिदीवरून भोंगे उतरवणार नसेल तर आम्ही त्याच्यासमोर जास्त आवाजात हनुमान चालिसा पठण करू असा इशारा दिला. त्यानंतर पुण्यातील मुस्लिम समाजातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच वसंत मोरेंचा प्रभाग मुस्लिम बहुल असल्याने त्यांना अडचण निर्माण झाल्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवले आहे. त्यानंतर आता वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. वसंत मोरेंना आगामी काळात मनसेच्या हिंदुत्वाच्या मुद्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाऊ शकतात असं बोललं जात आहे.
राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
एवढंच नाही तर त्यांनी घरावरून मनसेचा फलक हटविल्याची अफवाही पुण्यात पसरल्या आहेत. त्यातचं मनसेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरे यांची पाठराखण केली आहे. वसंत मोरे यांची मी बहीण आहे आणि ते लोकप्रतिनिधी असल्याने मी त्यांची अडचण समजू शकते असं वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी केलं आहे. वसंत मोरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
वसंत मोरे यांनी याबाबत समोर येऊन या सगळ्या अफवा जाणून बुजून पेरल्या जात असल्याचे म्हटले आहे आणि पक्ष प्रवेशाबाबत जी काही चर्चा सुरु आहे त्याचे खंडन केले आहे. वसंत मोरे यांनी जरी आता या सर्व गोष्टींचे खंडन केले असले तरी मुस्लिम बहुल भाग वार्डात जास्त असल्याने त्यांना मनसेच्या विरुद्ध भूमिका घ्यावीच लागेल अशी चर्चाही रंगली आहे.
Read also:
- सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
- राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
- संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
- संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण