मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देश बिकट परिस्थितीत सापडला आहे. या महामारीमुळे अनेक क्षेत्रांचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा जीडीपी दर उणे ७.३ टक्के इतका नीचांकी पातळीवर घसरला आहे. यावरून विरोधांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
आता काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी हिटलरचे नाव घेत पंतप्रधान मोदींवर उपरोधिक टीका केली आहे. मोदींची हिटलरशी तुलना करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
कांही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात ते १००% बरोबर नाही.
इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 5, 2021
काही लोक पंतप्रधानांची तंतोतंत तुलना हिटलरशी करतात. ते १००% बरोबर नाही. इतर गोष्टी अलाहिदा, हिटलरच्या काळात जर्मनी एक आर्थिक महासत्ता बनला होता हे विसरता येणार नाही, अशी टीका नितीन राऊत यांनी मोदींवर केली आहे.
याआधी देखील त्यांनी जीडीपीवरून सरकारवर निशाणा साधला होता. ज्या देशात रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं, जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा ७.३ जाणारच, असे त्यांनी म्हटले होते.
Read Also :
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’
- पुणे उद्यापासून ‘अनलॉक’, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?