पुणे : एकीकडे कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला देखील बसताना दिसत आहे. सर्वसामान्यांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. अशा आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांवर आता इंधन दरवाढीत देखील अडकल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.15 रुपये असून डिझेलसाठी प्रति लिटर 90.71 रुपयांपर्यंत पोहचला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन केले जात आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरमध्ये पेट्रोल पंपावर केलेले विरोध प्रदर्शन चर्चेत असतानाच आता पुण्यातील एका फ्लेक्सची चर्चा रंगली आहे.
पुणे काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी शहरातील मुख्य भागात याबाबत फ्लेक्स लावून इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘पेट्रोल-डिझेलची शंभरी पार केल्याबद्दल मोदी सरकारचे हार्दिक अभिनंदन’ असा जोरदार टोला काँग्रेसने प्लेक्सच्या माध्यमातून लगावला आहे. यात नरेंद्र मोदी भारतीय क्रिकेटपटूच्या जर्सीमध्ये दिसत आहे.
Read Also :
- पहिल्यांदा संसदेत जाताना शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिला होता ‘हा’ मोलाचा सल्ला
- ‘संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही, त्यांचा गैरसमज दूर केला’
- मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या ‘त्या’ सरपंचांनी गाव कोरोनामुक्त कसे केले ? वाचा
- अहमदनगरच्या नामांतरासाठी मनसे आक्रमक, केली ‘हे’ नाव देण्याची मागणी
- ‘संभाजीराजेंनी पक्ष काढल्यावर मला त्यांच्या पक्षात घेतील का माहिती नाही’