बीड : बीड काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मोदी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
राजकिशोर मोदी यांच्या ताब्यातील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या राज्यभरात १७ शाखा आहेत. अंबाजोगाई नगर परिषद ३० वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे. गेल्या ३० वर्षापासून ते काँग्रेसचं काम करत होते. १४ वर्ष युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहीले आहे. तसेत २०१३ ते २०१४ या काळते ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. २००९ ते २०१८ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ नागपूरचे उपाध्यक्ष होते.
Read Also :
- बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा, अशी विजय वडेट्टीवरांची गत झाली – गोपीचंद पडळकर
- उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी ‘त्या’ रात्री काय घडलं? नारायण राणेंनी केला मोठा गोप्यस्फोट
- खडसे विरुद्ध खडसे संघर्ष टळला, खासदार रक्षा खडसे यांचा अर्ज झाला बाद
- भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादीची दुकाने; खासदार अमोल कोल्हे यांच्या समोरच पक्षाचा भांडाफोड
- पिंपरी चिंचवडच्या स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचारावरून खडाजंगी; खासदार कोल्हेंच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी ऍक्शन मोडवर