नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीवर काहींनी टीका करताना, ‘वांझोटी बैठक’ असा उल्लेख केला. त्यावरून आज मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, बैठकीवर टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. “ओबीसी आरक्षण बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणणाऱ्यांचे तोंड वांझोटे आहे,” असा संताप त्यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केला आहे.
“…याचा अर्थ त्या कारवाया सूडभावनेने”, नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल
“कालच्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर होते, अश्या सर्वपक्षीय बैठकीला ‘वांझोटी बैठक’ म्हणून संबोधणे चुकीचे आहे. कालच्या बैठकीत, राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका, असेच सर्व पक्षांचे म्हणणे होते. त्यामुळे, अशा महत्वाच्या बैठकीला थेट ‘वांझोटी बैठक’ म्हणाऱ्यांची तोंडेच वांझोटी आहेत,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
“अजून एखादा ‘करेक्ट’ कार्यक्रम करून टाकू”, संजय राऊतांचा सूचक इशारा
“कायदा आणि न्यायपालिकेचे काही महत्त्वाचे मुद्दे, या बैठकीतून समोर आले आहेत. इंपेरिकल डेटा समोर आल्यानंतर काही जिल्ह्यातील आरक्षण शून्य टक्के होणार आहे, तर काही जिल्ह्यातील आरक्षण आत्ताच्या पेक्षा कमी होईल, तर काही जिल्ह्यात ते वाढेल देखील, त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर कायदा आणि न्यायपालिकेचे मत आणि सूचना जाणून घेणे आवश्यक आहे. आता पुढच्या शुक्रवारी या संदर्भातली दुसरी आणि अंतिम बैठक होईल आणि त्याच बैठकीत निर्णय होईल,” अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
यावेळी, “मराठा आरक्षणाच्या संदर्भाने आत्तापर्यंत मंत्रीमंडळाच्या एकूण १० बैठका झाल्या आहेत आणि त्यामानाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याच्या दोन ते तीनच बैठका झाल्या आहेत. त्यामुळे, आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी कोणाच्या किती बैठका झाल्या याला महत्त्वाचे नसून, शेवटी आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे,” असं सांगत, “काँग्रेस पक्षाची वेगाने वाढ होत असून, ज्यांना पदं मिळाली ते खूश आणि नाही मिळाली ते नाखूष आहेत, मात्र पक्षश्रेष्ठी सर्वांची नाराजी दूर करतील,” असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- उन्होंने हवा कर दी सर! नारायण राणेंना केंद्रातील बड्या नेत्याचा फोन, संवाद झाला व्हायरल
- तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
- “राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
- मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
- एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट