भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेस नेत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. नागपंचमीच्या सणानिमित्त मध्य प्रदेशाच माजी काँग्रेस अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांचा फोटो शेअर करीत लिहिले आहे कि नागपंचमीच्या शुभेच्छा…प्रश्न हा आहे की खऱचं अरुण यादव ज्योतिरादित्य शिंदे यांना साप म्हणत आहेत? काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर पार्टीचे काही नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर वारंवार टीका करीत आहेत. अरुण यादव यांनी ज्योतिरादित्यांची फोटो ट्विट करीत त्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावर्षी मार्चमध्ये माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी भाजपमध्ये सामील झाल्यानंतर म्हटले होते की काँग्रेस आता पहिल्यासारखी राहिली नाही. त्यामुळे तिथे राहून मी जनसेवा करता येत नाही.