काल राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली. या विमानांचे उत्साहात स्वागत केले. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. मात्र राहुल गांधी येथेच थांबले नाहीत, तर त्यांनी सरकारवर प्रश्नांची तोफ डागली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राफेल विमानांच्या खरेदीचा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला होता. आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी सरकारला तेच प्रश्न विचारत निशाणा साधला आहे.
Congratulations to IAF for Rafale.
Meanwhile, can GOI answer:
1) Why each aircraft costs ₹1670 Crores instead of ₹526 Crores?
2) Why 36 aircraft were bought instead of 126?
3) Why was bankrupt Anil given a ₹30,000 Crores contract instead of HAL?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 29, 2020
राहुल गांधींनी ट्विट केले की, राफेलसाठी हवाईदलाचे अभिनंदन. पण यादरम्यान सरकार उत्तर देईल का : प्रति विमान 526 कोटी रूपयांऐवजी 1670 कोटी रुपये का देण्यात आले?, एकूण 126 विमानांऐवजी 36 विमानांची खरेदी का करण्यात आली?, हिंदुस्तान एअरॉनॉटिक्स लिमिटेडऐवजी दिवाळखोर झालेल्या अनिल अंबानी यांना 30 हजार कोटींचs कंत्राट का देण्यात आले?
दरम्यान, काल 5 राफेल लढाऊ विमाने अंबाला येथील एअरबेसवर लँड झाली आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विमानांचे स्वागत केले.