महाविकास आघाडीचे सरकार स्थापनेवेळी आम्हीच सरकार स्थापनार यावर ठाम असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांचा शायराना अंदाज सर्वांनीच पाहिला. ट्विटवर शायरीच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना विरोधकांवर जोरदार टोलेबाजी केली होती. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी पुन्हा एक शायरी ट्विट केली आहे. मात्र विशेष म्हणजे काँग्रेस नेत्याने देखील या ट्विटला शायरीतूनच उत्तर दिले आहे.
उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में…
पर बेवजह खुश रहने का मजा ही और है..!!
🙏🏻🙏🏻 🙏🏻💕
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 28, 2020
उदासियों की वजह तो बहुत है जिंदगी में… पर बेवजह खुश रहने का मजा ही और है..!!, असा शेर राऊत यांनी ट्विट केला आहे. कारण नसताना आनंदी राहण्याची मज्जाच काही वेगळी आहे, असे राऊत यांनी म्हटले. मात्र राऊत यांच्या या शायरीला काँग्रेस नेते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील शायरीतूनच उत्तर दिले.
बेवजह खुश होने का मजा तो बहुत है जिंदगी में…
उदासियों को छिपाकर हँसने का मजा भी और है..!! https://t.co/MdSb6APBy5— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) July 28, 2020
बेवजह खुश होने का मजा तो बहुत है जिंदगी में… उदासियों को छिपाकर हँसने का मजा भी और है..!!, असा मजेशीर शेर नितीन राऊत यांनी शेअर करत संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले.