मुंबई : देशात महामारीची दुसरी लाट वेगानं फैलावत असतानाच, अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा जाणवत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, देशभरात जाणवत असलेल्या या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहायता निधीमधून राज्यांना नुकतेच अद्ययावत व्हेंटिलेटर्सचे वितरण करण्यात आले आहे.
दरम्यान, या अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आढळले असून आहेत, यामुळे ते वापराविना पडून असल्याची माहिती अनेक ठिकांणांहून मिळत आहे. यांचा वापर करणे घातक असून, असे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून राहुल गांधी यांनी, “पंतप्रधान सहायता निधीमधून मिळालेले व्हेंटिलेटर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरीच समानता आहे”, असा टोला पंतप्रधानांना लगावला आहे.
तसेच त्यांनी लिहिले आहे की; हे दोघेही जास्त खोटा प्रचार करतात. हे दोघेही आपले काम करण्यात अपयशी ठरले आहेत. गरजेच्या वेळी, यांना शोधणे अवघड बनले आहे.”
PMCares के वेंटिलेटर और स्वयं PM में कई समानताएँ हैं-
– दोनों का हद से ज़्यादा झूठा प्रचार
– दोनों ही अपना काम करने में फ़ेल
– ज़रूरत के समय, दोनों को ढूँढना मुश्किल।— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 17, 2021