गोवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची चर्चा सुरू असताना गोव्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेगळं वळण लागलं आहे. गोव्यात काँग्रेसच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दोन महिन्यापूर्वी गोव्यामध्ये ऑपरेशन लोट्स राबवण्यात अपयश आलं होतं, मात्र यावेळी भाजपची राजकीय खेळी प्रभावी ठरताना दिसत आहे. यावरून मुख्यमंत्री सावंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
संजय शिरसाठांना पुन्हा एकदा डावललं..! शिंदे गटाच्या नियुक्त्या जाहीर
काँग्रेसच्या 11 आमदारापैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोव्यातील काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये येत आहेत त्याचं मी स्वागत करतो. काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. मात्र गोव्यात काँग्रेस छाडो यात्रा सुरू झाली आहे, अशी टिका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.
“हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्ये व्यस्त, विरोधकही काही बोलत नाहीत”; राजू शेट्टी आक्रमक
गोव्यातील काँग्रेसच्या 11 आमदारापैकी 8 आमदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत, माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो, तसेच माजी मंत्री अलेक्स सिक्वेरा, यांच्यासह दिलायला लोबो, राजेश फळदेसाई, रूदाल्फ फर्नांडिस, लेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर या आमदारांचा समावेश आहे.
“पोलीस ठाण्यात जाऊन माझं काम मी इमानदारीनं केलंय”; नवनीत राणा
गोव्यात एकुण विधानसभेच्या जागा 40 आहेत. यामध्ये भाजपने 20, काँग्रेसचे 11, एमजीपी 02, गोवा फॉरवर्ड पार्टी 01 व इतर 06 अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे आपलं सरकार अधिक मजबुत करण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रयत्न करत असल्याचं याआधीही आपल्याला पाहायला मिळालं आहे. याच भाजपच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे.
Read also
- “लक्षात ठेवा…! राज्यात अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे”; तुषार भोसले
- “माझी अक्कल काढली, तरी मला फारसं वाईट वाटत नाही”; पेडणेकरांना बावनकुळेंचं प्रत्युत्तर
- सेनेची जागा आता भाजप घेणार..! रिक्त झालेल्या जागेवर भाजपचा दावा, सेना-भाजपमध्ये रस्सीखेस
- शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठा राजकीय भुंकप..! माजी मुख्यमंत्र्यांसह काॅंग्रेसचे 8 आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश
- “राज्यात उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही?”; राज ठाकरेंनी शिंदे सरकारला फटकारलं