राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कालच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यवर रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री रेखा यांचा बंगला देखील सील करण्यात आला आहे. तर राजभवनात देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.
राजभवनातील 14 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या 14 जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राजभवनात एकूण 100 कर्मचारी आहेत. त्यापैकी 40 जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला. यामध्ये 14 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 60 कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे. दोन दिवसांपूर्वी 100 जणांची चाचणी झाली होती. त्यात 40 जणांचे अहवाल आले आहेत. त्यापैकी 14 जणांना लागण झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.