देशासह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोक प्रतिनिधींना देखील दौरे करत असताना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. वैभव नाईक हे सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवणचे आमदार आहेत.
नाईक यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दौरे केले होते. ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनेकांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्या डॉक्टरांचे पथक नाईक यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेत आहे. गेल्या 5 दिवसांपासून नाईक ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले होते. त्यांचा शोध सुरू असून त्यांचीही कोरोना चाचणी करणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. वैभव नाईक हे दोन-तीन दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सोबत देखील होते.