डेहराडून : जागतिक कोरोना महामारीने देशाला घट्ट मिठीत घेतले आहे. लसीकरण, ऑक्सिजन, हॉस्पिटलमध्ये बेड अशा अनेक प्रश्नांचा सामना सर्व भारतीय करत आहेत. कोरोनाशी सुरू असलेल्या या युद्धात सर्वजणांनी पुढाकार घेतला आहे. पण उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांनी अकलेचे तारे तोडल्याने अनेकांचा संताप अनावर झाला आहे.
‘कोरोना व्हायरस हा सुद्धा एक जीव आहे, आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे,’ असं वक्तव्य उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांणा उधाण आलं आहे. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल होऊ लागला असून नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.
"कोरोना एक प्राणी है"
– पूर्व CM एवं BJP नेता त्रिवेंद्र सिंह रावतफिर तो इसका आधार कार्ड/राशन कार्ड भी होगा ? pic.twitter.com/1uhcb92JWQ
— Srinivas B V (@srinivasiyc) May 13, 2021
‘कोरोना व्हायरस हा देखील एक जीव आहे. इतरांसारखा त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. पण आपण मनुष्य स्वत:ला खूप बुद्धिमान समजतो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे कोरोना स्वत:मध्ये वारंवार बदल करत आहे. मानवाने सुरक्षित राहण्यासाठी व्हायरसच्या पुढे जाणं गरजेचं आहे’, असे रावत यावेळी बोलताना म्हणाले. रावत यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात त्यांना ट्रोल करण्यास सुरवात झाली आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून रावत यांच्यावर निशाना साधला आहे. कोरोना सुद्धा जीव आहे त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, असे भाजपचे उत्तराखंडचे माझी मुख्यमंत्री रावत म्हणत आहेत. खऱ्या अर्थाने असे म्हणनाऱ्या नेत्यांना त्यांच्या साठी माणसे मेली तर काय फरक पडतो, असे म्हणत आव्हाडांनी निशाना साधला आहे.
कोरोना सुद्धा जीव आहे त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे ….म्हणता आहेत #BJP चे उत्तराखंड चे माझी मुख्यमंत्री श्री रावत ….
म्हणूंन त्यांच्या साठी माणसे मेली तर काय फरक पडतो …. pic.twitter.com/bxFud1W4R8— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2021