पुणे : एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, लसीकरणाचा वेग देखील गेली काही दिवसात मंदावल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होत चालली आहे, मात्र लसच उपलब्ध नसल्याने लसीकरणावर देखील परिणाम होत आहे.
पुण्यात आज (17 मे) लसीकरण पूर्णपणे बंद असणार आहे. यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. पुरवठा न झाल्याने लसीकरण बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे आज बंद राहतील.
पुरवठा न झाल्याने सोमवारी लसीकरण होणार नाही !
पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने सोमवार, दि. १७ मे, २०२१ रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. पुणेकर नागरिकांनी नोंद घ्यावी.
मुरलीधर मोहोळ,
महापौर— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) May 16, 2021
पुणे शहरात आजही 45 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणासाठी केवळ 15 केंद्रच उपलब्ध होती. या सर्व केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस देण्यात आली. तसेच 17 एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला गेला.
दरम्यान, पुण्यात गेली 24 तासात 1317 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 20589 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जवळपास 3 हजार रुग्ण बरे झाले आहेत.
Read Also :
- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांनी घेतला तयारीचा आढावा
- केंद्राकडून खतांच्या किंमतीत वाढ, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- मराठा समाजाच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा – प्रवीण दरेकर
- संजय गायकवाडांनी शब्द पाळला, थेट चिकन बिर्याणी आणि अंड्यांचे केले वाटप
- नाशिकमध्ये व्यापाऱ्यांची दुकाने होणार सुरु? छगन भुजबळ घेणार आढावा बैठक