पुणे – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींनाही कोरोना लसीकरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता अजितदादा केंद्र सरकारकडे मागणी करणार आहेत.
“महाराष्ट्रातील पुण्यासह वेगवेगळ्या राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे धोरणात्मक बदल आवश्यक आहे. 18 वर्ष वयोगटावरील नागरिकांसाठी तात्काळ लसीकरण उपक्रम सुरु करण्यात यावा. त्यासाठी संबंधित राज्यांना अधिकाधिक लसी उपलब्ध करुन द्याव्यात” असं अजित पवार म्हणाले. अशा जिल्ह्यांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज निती आयोगाच्या (आरोग्य) सदस्यांनी केल्याकडेही अजित पवारांनी लक्ष वेधले.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार 485 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता रुग्णांचा पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू किंवा कडक निर्बंध लावले जात आहेत.