कोरोना च्या संकटामुळं सर्व धार्मिक सण, उत्सव यावर मर्यादा आल्या आहेत. कोरोनाचा फटका आता राष्ट्रीय सणांना पण बसला आहे. यंदाचा स्वातंत्र्य दिन कोरोनाच्या काळात साजरा केला जाणार आहे. यासाठी खबरदारी म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने मागदर्शक सूचना जारी केली आहे.
सूचनांमध्ये स्वातंत्र्यदिनी सामूहिक कार्यक्रम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा. देशातील कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
काय आहेत सूचना?
कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा.
गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
सोशल डिस्टेंसिंगच पालन करावे.
कार्यक्रम स्थळी मास्क वापरला जावा.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सॅनिटायझेशनची व्यवस्था करावी.
राज्य सरकारांना सल्ला देण्यात आला आहे की, कार्यक्रमांसाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांना सन्मान देण्यासाठी कार्यक्रमात आमंत्रित करावे. ज्या लोकांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर निरोगी झाले आहेत. अशा लोकांनाही कार्यक्रमांमध्ये बोलावले जाऊ शकते.