बुलढाणा : एकीकडे बुलढाणा जिल्ह्यातील कोरोनारुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील 138 गावांमध्ये अद्याप कोरोनाचा शिरकावच झाला नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणें यांनी नुकत्याच घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत राजेश लोखंडे यांनी हा दावा केला आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे म्हणाले की, जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतीलमध्ये 1314 गावं आहेत. एप्रिलमध्ये शहरी भागाच्या तुलनेत गावात अधिक रुग्णसंख्या होती. त्यानंतर योग्य उपाययोजना करण्यात आल्या. जिल्ह्यातील 138 गावांमध्ये एकाही व्यक्तीला कोरोना झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
मात्र, आता तपासणीत शहरांपासून लांब असलेल्या या दुर्गमभागातील गावांमध्ये अनेक रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. एकीकडे गावातील सरपंचच समोर येऊन गावातील रुग्णांबाबत आता माहिती देत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र 138 गावांमध्ये एकही रुग्ण आढळला नसल्याचा अजब दावा केला आहे.
Read Also :
- नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण
- कोरोनामुक्तीचा हिरवे बाजार पॅटर्न, पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सीरम इंस्टिट्यूटची थेट पुणे शहराला लस देण्याची तयारी, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- सुबोध जयस्वाल यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
- तरुणाची गांधीगिरी, रुग्णांना लुटणाऱ्या हॉस्पिटलविरोधात केले ‘अर्धनग्न’ आंदोलन