मुंबई – कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि आमदार समीर मेघे तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे नेतेच सुपरस्प्रेडर आहेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काही दिवसांपासून लग्नसराई वाढली आहे. त्यातही नेत्यांच्या मुला, मुलींच्या लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्री जयंत पाटील, निरज गुंडे, रविंद्र फाटक, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचे लग्न झाले, तर हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचेही लग्न झाले.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु तिसरी लाट ही महाराष्ट्रातील मंत्र्यांपासूनच सुरु झाली असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण कोणाला झाली नाही ही दिलासादायक बाब आहे. परंतु राज्याच्या हिवाळी अधिवेशनानंतर अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अधिवेशनादरम्यान विधिमंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मागील ७ दिवसांमध्ये ७ ते ८ बड्या राजकीय मंडळींना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्याबाबतची माहिती या नेत्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील, निरज गुंडे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मुलाचे लग्न झाले, तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचेही लग्न झाले. या लग्न सोहळ्यांना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. तसेच लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे नेत्यांच्या मुलांचे लग्न कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरत आहेत.
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवल; कालिचरण महाराज यांना अटक
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
I learned today that I tested positive for COVID-19 after first feeling symptoms yesterday evening. My symptoms are relatively mild. I'm fine and have isolated myself. Request those who met me the past few days to take precautions.
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 28, 2021
Read also:
- आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली
- महाविकास आघाडीला मोठा धक्का; सतीश सावंत पराभूत..!
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!
- हुर्ररररर… हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?
- कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका