मुंबई : आगामी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी अलिकडेच विदर्भाचा दौरा केला होता. तसेच त्याठिकाणी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तसेच पुढच्या सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढविणार असल्याचं म्हटलं आहे.
“हल्ली बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात फिरतेय”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर निशाणा
यातच शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेचे विचार मांडले जातील, अशी खोचक टिप्पणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर बोलताना म्हणाले की, हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधिमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचे? असा खोचक सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
“निवडणुक आली की गिधाडांना मुंबई दिसते, हिंमत असेल तर, घ्या निवडणुक”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शरद पवार यांना प्रत्युत्तर म्हणून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, आज बोटं मोजताय. उद्या बोटं मोडाल आणि परवा बोटं तोंडात घालाल. आम्ही धन से कमी आहोत. पण मनसे लई आहोत. आदर देतोय, आदर घ्या. असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी मौका सभी को मिलता है असा हॅशटॅग देखील दिला आहे.
“शिवसेना फुटल्याचं दु:ख आहे , तुम्हाला राष्ट्रवादी जवळची की पन्नास आमदार?” रामदास कदम
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापांसून राष्ट्रवादीवर मनसे सातत्याने टिका करीत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी देखील मनसेवर तुटून पडत आहेत. यात भाजप आणि शिंदे गट आगामी निवडणुका सोबत लढविणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपचे नेते राज ठाकरे यांची भेट घेत होते. परंतु राज ठाकरे यांनी आम्ही निवडणुका स्वबळावर लढविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Read also
- “तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
- “ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर
- शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
- “उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
- “महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका