मुंबई: गेल्या महिन्यात मुंबै जिल्हा सहकारी बँकेचा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकार आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आक्रमक खेळीमुळे महाविकास आघडीचा जिल्हा बँकेत दणदणीत विजय झाला. यानंतर माजी अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे बँकेचे सदस्यत्व रद्द झाले झाले.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल
आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रवीण दरेकर यांनी अटक टाळण्यासाठी मुभा मिळावी म्हणून मुंबई हायकोर्टात अटक न करण्याची मागणी केली होती. मात्र दरेकरांना आता कोर्टानेही झटका दिला आहे आणि अटकेपासून संरक्षण करण्याची मागणी फेटाळून लावण्यात आली आहे.
” दरेकरांवरील कारवाई सूडबुद्धीने नव्हे तर सडक्या बुद्धीने “; आशिष शेलारांचा राज्य सरकारवर घणाघात
यासंदर्भात विधिमंडळात देखील बऱ्याच वेळ दरेकरांनी कशी फसवणूक केली याबद्दल सांगण्यात आले आहे. प्रवीण दरेकर यांच्याविरोधात धनंजय रामकृष्ण शिंदे (आप सचिव) यांनी ८ जानेवारी २०२२ रोजी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता असं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर गटातून निवडून आले होते. २०१६ मध्ये त्यांनी विधानपरिषद सदस्यत्वाच्या शपथपत्रात त्यांनी त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे.
भाजपला ते आंदोलन भोवलं; भाजपच्या आमदारासह अन्य 23 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
विधान परिषदेच्या शपथपत्रात प्रवीण दरेकर यांनी सरळ सरळ मजूर असल्याची माहिती दडवून स्वतंत्र व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी लोकसेवक या नात्याने राज्य सरकारची तसेच मुंबई बँकेच्या लाखो ठेवीदारांची फसवणूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असल्याचेही पाटील यांनी सांगितले आहे. आता दरेकरांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“घर का काॅंग्रेस नकोय, सब की काॅंग्रेस हवंय”; ज्येष्ठ काॅंग्रेस नेते कपिल सिब्बल यांचं वक्तव्य
नवाब मलिकांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
ईडीच्या कारवाई प्रकरणी नवाब मलिकांना उच्च न्यायालयचा झटका ; याचिका फेटाळल्याने मलिक अडचणीत