रायगड जिल्हाध्यक्षपदी असणारे दत्तात्रय मसुरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. या ठिकाणी पक्षाचे निष्ठावंत आणि खासदार सुनील तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेश लाड यांना जिल्हाध्यक्ष पदावर निवडल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार सुरेश लाड यांची नियुक्ती केली.
दरम्यान, रायगडमध्ये महाविकासआघाडीतील मित्रपक्षांमधील समन्वयाचाही प्रश्न उपस्थित झाला होता. कोकणातील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरुन मतभेद होते. मात्र उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली