अमरावती: वनपरिक्षेत्रधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी वनखात्याने नेमलेली चौकशी समिती केवळ फास ठरली आहे. चार महिन्याचा कालावधी लोटूनही समिती अहवाल सादर करू शकली नाही. दुसरीकडे, आरोपी निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस के रेडींग हे जामिनावर सुटून बाहेर आले आहेत.
हे पण वाचा: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
दिपाली आत्महत्याप्रकरणी वनबलप्रमुख पी. साई प्रसाद यांनी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होण्यासाठी वनविभागाकडून नऊ सदस्यीय समिती घटन केली होती. या समितीला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र आता चार महिने लोटूनही समितीचा अहवाल अहवाल आला. नाही त्यामुळे वनखात्याची समिती हा केवळ फार्स असल्याचा आक्षेप खरा ठरू लागला आहे.
हे पण वाचा: ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
अशी आहे वनविभागाची चौकशी समिती
अध्यक्ष प्रधान मुख्य वनरक्षक एस के राव, सहअध्यक्ष अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा त्रिवेदी, मेळघाटच्या अधिकारी जगताप, ज्योती पवार आरएफओ चे विजया कोकाटे. सेवानिवृत्त किशोरी डिएफओ मिस्त्रीकोटकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांचा समितीमध्ये समावेश आहे. या समितीच्या तीन उपसमिती गठण करण्यात आल्या होत्या.
हे पण वाचा: मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
रेड्डींच्या याचिकेवर सुनावणी तहकूब
निलंबित अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस के श्रीनिवास रेड्डी यांनी स्वतः विरुद्धच्या एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी तहकूब करून पुढील सुनावणी ४ ऑगस्ट रोजी तारीख दिली आहे.
हे पण वाचा: नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
सरोदे यांचा महिनाभरातच अहवाल
राज्य शासनाने नेमलेल्या आयपीएस प्रज्ञा सरोदे यांच्या समितीने महिन्याभरात शासनाकडे अहवाल दिला. सरोदे यांनी मुंबईहून अमरावती गाठली. हरीसाल येथे घटनास्थळी भेट दिली. दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांची साक्ष नोंदवली. काही वनअधिकारी कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या, एसीपी कार्यालयात बसून रेड्डी यांच्या अटकेचे आदेश दिले. पण वनविभागाची समिती मात्र चार कागदे सादर करू शकली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे
Read Also :
- थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी