मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदासाठी रस्सीखेस सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हात अब्दुल सत्तार यांच्याकडे राज्यमंत्री तर संदीपान भुमरें यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आहे. त्यामुळे याच औरंगाबाद जिल्ह्यातून शिंदे सरकारमध्ये बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी देखील मंत्रिपदासाठी मागणी केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अशातच आता बच्च कडू यांनी देखील राज्यमंत्री पदावरून आता कॅबिनेट पदाची मागणी केली आहे.
सातारा जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी; एकनाथ शिंदे सातारा जिल्हातील 4 थे मुख्यमंत्री
अब्दुल सत्तार आणि संदीप भूमरे यांना मंत्रिपद मिळणार असल्याने संजय शिरसाठ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. तर अमरावतीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी शिंदे सरकारमध्ये जलसंधारण, ग्रामविकास किंवा कृषी खात्याच्या मागणी केली आहे. ठाकरे सरकारमध्ये बच्चू कडू यांना राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. अशातच आता शिंदे गटात मंत्रिपदावरून मोठी नाराजी बघायला मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर फडणवीसांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार आणि संदीप भुमरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. त्यामुळे आता शिंदे सरकारमध्ये मला स्थान देण्यात यावं असं बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांनी केलं आहे. तसेच एकाच जिल्ह्यात तीन मंत्रिपद देण्यात येणार नाहीत. अशी समजूत सध्या संजय शिरसाठांची वरिष्ठांकडून काढण्यात येत आहे.
बारामतीच्या दादाची जागा कोथरूडचा दादा घेणार; अन् फडणवीस महाराष्ट्र पालथा घालणार
शिंदे गटातून जर औरंगाबाद जिल्ह्यात तीन पदे दिलीत तर भाजपच्या गोट्यातील देखील अतुल सावे, हरिभाऊ बागडे, आणि प्रशांत बंब सारखे जिल्ह्यात मोठे नेते आहेत. त्यामुळे ते देखील मंत्रीपद मागण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये अतुल सावे हे फक्त चार महिन्यांसाठी उद्योग राज्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
Read also
- “लक्षात ठेवा.. यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे”; राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र
- मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब
- शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेस; अब्दुल सत्तार, भुमरें अन् संजय शिरसाठ यांच्यात वाद
- “हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही”, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं
- “ना, फडणवीस, ना ठाकरे यंदा एकनाथ शिंदे करणार विठ्ठालाची शासकीय महापुजा”