पुणे : आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पुण्यातील निर्बंध शिथिल केले गेले असल्याची घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील व्यापाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची, दुकानदारांची आणि नागरिकांची लेव्हल ३ चे निर्बंध कमी करण्यात यावेत, अशी मागणी होती. त्यानुसार आज पुण्याला शिथिलता देत उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्यांना दिलासा दिला.
मोठी बातमी! १५ ऑगस्टपासून लसींचे २ डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना करता येणार लोकल प्रवास
यावेळी त्यांनी, सध्या राष्ट्रवादी-भाजपत सुरु असलेल्या मेट्रो श्रेयवादाच्या मुद्यावरही भाष्य केलं. “अगदी साधेपणाने आणि मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करायचा होता, म्हणून मेट्रोच्या ट्रायल रनचे उद्घाटन स. ७ वा. झाले. खरंतर ही फक्त ट्रायल रन होती. आता ट्रायलला पण भडकता की काय?” असा खोचक सवाल करत त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांना जोरदार टोला लगावला.
तसेच, “मंदिर आणि उत्सवांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. पण जो काही निर्णय असेल तो पुण्यासाठी सुद्धा लागू आहे. मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे मुंबई-पुण्यातील महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करत असतात. मात्र जिथे लोकांची गर्दी होते तिथं कोरोनाचा फैलाव वाढतो. त्यामुळे आपण उत्साहाला मुरड घातली पाहिजे, असं सांगत त्यांनी, “पुण्याबाबतचा आजचा निर्णय मुख्यमंत्री-अधिकारी आणि माझ्या संगनमताने झाला आहे”, असं त्यांनी सांगितलं.
मोठी बातमी! उद्यापासून पुणे अनलॉक, दुकाने आता दिवसभर खुली, तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे महापालिका क्षेत्रातील वनाज-रामवाडी मार्गिकेमधील पूर्ण झालेल्या पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. मात्र याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नसल्याने, राष्ट्रवादी पुणे मेट्रोचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी ७ ऑगस्टला पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली.
Read Also :
- भाजप आमदार-खासदारांच्या दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठका, दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिजतंय का?
- राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, आठवड्याभरापासून आहेत उपचार सुरु
- प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल