राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने उद्धव ठाकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही रात्री बरोबर 12 वाजता मुख्यमंत्र्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहे. मात्र शुभेच्छा देताना शेअर केलेल्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/PlrNgNg508
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 26, 2020
अजित पवार यांनी शुभेच्छा देताना लिहिले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे.
शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही नेते एका गाडीत बसलेले दिसत आहे. या गाडीचे स्टेअरिंग अजित पवार यांच्या हातात आहे. कालच संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे राज्यातील सत्ता तीन चाकांवर असली तरी त्याचे स्टेअरिंग माझ्या हाती आहे. दोघे मागे बसलेले आहेत, असे म्हणाले होते. त्यामुळे या फोटोची विशेष चर्चा रंगत आहे.