पुणे : खडकवासला धरण पाणलोट परिसरात तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरु आहे. कालपासून खडकवासला, मुळशी, टेमघर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला. तर खडकवासला धरण 100 टक्के भरले. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून धरणातुन प्रारंभी पाच हजार क्यूसेक इतक्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. परिणामी नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकली आहे. त्यामुळे भिडे पुलावरील वाहतूक बंद करण्यात अली आहे.
राज्यातील पूरग्रस्त भागात मिळणार लसीकरणाला गती! फडणवीसांना सोबत घेऊन राजेश टोपे जाणार केंद्राकडे
नदीच्या पाण्यासह वाहून आलेली जलपर्णी भिडे पुलामध्ये अडकल्याने डेक्कन येथील भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला असल्याचे दिसून आले आहे. अडकलेली जलपर्णी हटविण्याचे काम पुणे महापालिकेकडून सुरू आहे.
रायगडच्या तळीयेमध्ये भीषण दुर्घटना, दरड कोसळून तब्ब्ल ३२ जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
पुणे महानगर पालिकेकडून पावसाळ्या अगोदर आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जातात. मात्र महापालिकेकडून यामध्ये दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे. दरवर्षी मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जातो, मात्र यावर्षी भिडे पूल जलपर्णीखाली गेला असल्याचं चित्र होतं.
Read Also :
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय नियंत्रण कक्षातून दिले, डोंगरउतारांवरील वस्त्यांमधील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश
- “कोकण बुडत असताना राज्यकर्ते मात्र पार्ट्या झोडताय” अनेकांनी व्यक्त केला संताप
- कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, आमदार ऋतुराज पाटील भर पावसात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी
- राज्याला लोकांचं हित जोपासणारा मुख्यमंत्री हवा, ड्रायव्हर नको, नारायण राणे यांची खोचक टीका
- सांगली पालिकेकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन, कृष्णा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर