मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि त्यामुळे आलेल्या महापुराने अनेकांचे संसार उघड्यावर आणले, तर अनेकांच्या जिवाभावाची माणसे त्यांच्यापासून हिरावून नेली. दरम्यान, या हाहाःकारानंतर विरोधी पक्षाने, सत्ताधारी नेत्यांना धारेवर धरले असून, आज मुंबई मध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, महाविकास आघाडी सरकारला मोलाचा सल्ला दिला आहे, तर भास्कर जाधवांना शालीतून जोडे लगावले आहेत.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, खासदार, मंत्र्यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देणार – अजित पवार
“नैसर्गिक आपत्ती आल्यावर जनतेमध्ये आक्रोश धुमसत असतो, पण याचा अर्थ जनता तुमच्या विरोधात नसते. अशावेळी, राज्यकर्त्यांनी संयम राखणं महत्त्वाचं असतं, जनतेच्या अंगावर धावून जायचं नसतं. जनेतला तुमच्याशी बोलायचं असतं, ते अपेक्षने बोलत असतात. अशावेळी त्यांना याप्रकारे अंगावर जाऊन गप्प करणं, हे धक्कादायक आहे,” अशा शब्दांत त्यांनी टीकेचे जोडे लगावले. तसेच, जाधव यांच्यावर कारवाई करावी की करू नये, ही पक्षांतर्गत बाब आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द! मात्र ‘पुन्हा येईन’चे दिले आश्वासन
दुसरीकडे, महाविकास आघाडीला देखील त्यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. “कोकणात गेल्या ३ वर्षांत मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता सरकारने, आम्ही जीआर बदलून सांगली-कोल्हापूरला मदत केली, तशीच मदत कोकणवासीयांसह इतर पूरग्रस्तांना करण्याची गरज आहे,” असं सांगून लवकरच हा पूरप्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे भाष्य केले आहे.
“चले जाव चले जाव भास्कर जाधव चले जाव”, पुण्यात भाजपचे जोडे मारो आंदोलन
काल मुख्यमंत्री चिपळूण दौऱ्यावर असताना, , एका दुकानदार महिलेने, “तुम्हीच आमची मदत करू शकता, हवं तर खासदार-आमदारांचे २ महिन्याचे पगार कोकणसाठी वळते करा, पण आम्हाला वाचावा!” असा टाहो फोडला असता, आमदार जाधवांनी कुत्सितपणे हसत, “तुझा मुलगा कुठंय? ए आईला सांभाळ रे!” असं म्हणत महिलेची चेष्टा केली. तसेच, अजून एका घटनेत त्यांनी, मुख्यमंत्र्यांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडणाऱ्या एका महिलेवर थेट हात उगारला. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ क्लीप्सनी, राज्यात नवीन राजकीय समीकरणाची शक्यता?
दुसरीकडे आज जाधवांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, “ती महिला माझ्या मुलीसारखी आहे. तिचा मुलगा आणि माझा मुलगा एकत्र कॉलेज मध्ये जात होता. माझ्या जुन्या शिवसेनेच्या सहकाऱ्याची, ती पुतणी आहे. मला नाहक बदनाम केलं जात आहे,” असं म्हणत स्वतः वरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
Read Also :
- ‘त्या’ घटनेवर महिलेने सोडले मौन; भास्कर जाधवांनीही दिली प्रतिक्रिया, म्हणतात…
- सांगलीतील भिलवडी बाजारपेठेचे अजित पवारांकडून बोटीतून पाहणी; खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्द
- कोल्हापूरात पावसाच्या पाण्यानंतर आता पिण्याच्या पाण्याचे संकट; पुणे महापालिकेची मदतीसाठी धाव
- ब्रेकिंग! कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचा राजीनामा, भावुक होत केले मोठे विधान!
- भास्कर जाधवांच्या महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी नंतर, संजय राऊत म्हणतात….