मुंबई : राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी २१ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर तीन्ही मंत्र्यांचं मंत्रालयात जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदावर भाष्य केले. सरकार चालवण्यासाठी सक्षम व्यक्ती सोबत असणं गरजेचे असते असे देवेंद्र पडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे गृहमंत्री पदावरील पेच आता सुटला आहे का ? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुरूवातीला एकनाथ शिंदे हे गृहमंत्रीपदावरून आडून बसले असल्याची चर्चा होती. त्यामुळे ते उपमुख्यमंत्री पद देखील घेणार नाहीत, अशीही एका बाजूला चर्चा होती. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी खरी हकीकत सांगितली आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यात काहीही तथ्य नाही. याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झाले. त्यांना सांगितलं की मला पण बनायचं नाही. परंतु सरकार व्यवस्थित चालवण्यासाठी यातच पक्षाचा मजबुत व्यक्ती जर सरकारमध्ये असेल तर पक्ष देखील व्यवस्थित चालतो. त्यानंतर एका मिनिटात त्यांनी मान्य केले.
हेही वाचा…“मुख्यमंत्री बदलतो, पण अजित पवार झालेहेत पर्मनंट उपमुख्यमंत्री”, नवा रेकॉर्ड अलर्ड मोडवर..
गृहखात्यावरून आमच्यात चर्चा सुरू होती. परंतु कोणतीही रस्सीखेच झाली नाही. सरकारमधील काही खातं असे आहे की, त्याला खुप महत्व आहे. त्यामुळे तिन्ही पक्षाला आम्ही व्यवस्थित खात्याचे वाटप करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थात महायुतीचा प्रयत्न असेल तर स्थानिक पातळीवर निर्णयाचं स्वातंत्र्य आहे. असे म्हणत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मोहित कंबोज आता मुंबईतील खंडणीखोर होईल”, गजाभाऊचा आणखी एक व्हिडीओ आला समोर
हेही वाचा..“एक तर तु राहशील नाहीतर मी,” ठाकरेंच्या विधानावर फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर..! म्हणाले…
हेही वाचा…संसदेत कॉंग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली सापडलं नोटांचं बंडल, चौकशी सुरू
हेही वाचा…मोठी बातमी..! हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती