बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केल्याने, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मात्र, फडणवीस यांचा दौरा जाहीर झाल्यानंतर, पंकजा मुंडे यांनी ट्विट करत, माझ्या टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम आहे. मी दोन-चार दिवस कोणाचाही फोन घेऊ शकत नाही किंवा कोणासही बोलू शकत नाही, त्यामुळे मी घरीच आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा बाजीगर कोण? तीन ४३ च्या प्रभाग रचनेत कोणाच्या नाड्या आवळल्या जाणार?
अश्या पद्धतीचे ट्विट करून पंकजा मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच पंकजा मुंडे आजारी अशी जोरदार चर्चा झाली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आज नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. उद्या ते लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील पाहणी करणार आहेत.
Unwell..tonsillitis n blisters in my throat adviced strick voice rest for 2 to 4 days … can't take calls or meet in person..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 1, 2021
मात्र, उद्याच्या दौऱ्यात त्यांनी बीडला वगळले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी ट्विट करून आजारपण सांगितल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यातून बीड जिल्ह्याला वगळले तर नाही ना? अशा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्यामुळे एकीकडं अतिवृष्टीने शेतकरी पिचला असताना, दुसरीकडे मात्र पहाणी दौऱ्यातून राजकीय कुरघोड्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Read Also :
- ऑफिसच्या एसीत बसून मोठे लीडर झाले, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार? – फडणवीस
- अभ्यास नको, गप्पा मारा; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची वर्गात जाऊन भन्नाट सुरूवात
- देवेंद्र फडणवीसांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करता करता शिवसेना नेता फोडला; लवकरच होणार भाजप प्रवेश
- राज्यातील विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज – चंद्रकांत पाटील
- रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद – फडणवीस