पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर जे. पी. नड्डा यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं. यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. मागील काही दिवसापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आलं आहे. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात बदल होणार का ? अशीही चर्चा सुरू झालीय.
हेही वाचा…यंदा माधुरीताईंचं तिकीट कापणार? श्रीनाथ भीमाले भाजपकडून स्ट्रॉंग उमेदवार.!
लोकसभेत झालेल्या पराभावानंतर राज्य सरकारमधील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करून भाजप संघटनेसाठी काम करण्याची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी पक्ष श्रेष्ठींनी यासाठी नकार दिला होता. यातच आता देवेंद्र फडणवीस यांना थेट दिल्लीतच बोलवून घेण्याची योजना आखल्याची माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचीही धुरा दिली जाऊ शकते. यातच राष्ट्रीय स्वंयक सेवक संघाचा देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा असल्याचे समजत आहे.
हेही वाचा..मुख्यमंत्री शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का..! शिवसेनेचा ‘हा’ हुकूमी एक्का स्वगृही परतला
यातच देवेंद्र फडणवीस यांची सध्या दिल्लीत जाण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, बऱ्याच बातम्या मला माध्यमांकडूनच कळतात. देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होणार असतील तर आम्हा सर्वांना त्याचा आनंद आहे. त्यांच्यात ते सर्व गुण आहेत. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी देखील फडणवीस यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..महायुतीत बिनसलं..! नरहरी झिरवाळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध
हेही वाचा..विकासाची गॅंरंटी..! जनतेचे १२०० कोटी पाण्यात, नव्या संसदेला लागली गळती..!
हेही वाचा..विधानसभा निवडणुका ठाकरे गट ‘या’ चिन्हावर लढणार ? निवडणूक आयोगाला धाडलं पत्र
हेही वाचा..“तुम्हाला जळी, स्थळी, पाषाणी केवळ उद्धव ठाकरे दिसतात”, इतना डर होना भी चाहिए..!