माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. कोरोना संदर्भातील स्थिती आणि साखर कारखान्यांना मदत मिळावी यासाठी हे भेट घेतली. ही कोणतीही राजकीय भेट नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
After visiting most #COVID19 affected Maharashtra districts, briefed Hon PM @narendramodi ji on assessment and actual #Coronavirus situation on ground.#CoronaInMaharashtra pic.twitter.com/nXhBWc9p1y
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2020
फडणवीस यांनी संगितले की, यावर्षी महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढल असून शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी घेतली असल्याचे ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची ग्राउंड रियालिटी काय होती, हे सांगण्यासाठी भेट घेतली. महाराष्ट्राचा दौरा केल्याने खरी काय स्थिती आहे याची माहिती त्यांना दिली. आधीपासूनच केंद्र सरकार महाराष्ट्राला आवश्यक असलेली सर्व मदत करत आहे. विरोधी पक्षनेता म्हणून पंतप्रधानांना जी माहिती देणे आवश्यक आहे, त्यासाठी ही भेट होती व इतर कुठलीही मागणी केलेली नाही.