मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 22 वर्षांच्या पुतण्याने कोरोना लस घेतल्याचे समोर आले होते. फडणवीसांचा पुतण्याने तन्मय फडणवीसने स्वतः लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. मात्र, त्याआधी तन्मयने लस घेतल्याने विरोधकांकडून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. आता तन्मयने 25 वर्ष पूर्ण नसताना लस कशी घेतली ? याचा खुलासा झाला आहे.
तन्मयने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतली असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत ही माहिती मिळवली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी यासंदर्भात 21 एप्रिल 2021 रोजी यासंदर्भातल्या माहितीची मागणी करणारा अर्ज मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात केला होता. यात तन्मयने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचे समोर आले.
दरम्यान, या प्रकारामुळे महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता. तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.
Read Also :