पुणे : येत्या महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यानतंर महापौर पदाकरता जर अनुसूचित जातीचे आरक्षण पडले तर हे पद ‘आरपीआय’ला दिले जाईल, असे आश्वासन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. त्यासाठी आरक्षणात अनुसूचित प्रवर्गाचे आरक्षण यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
शेतकऱ्यांना हर्बल तंबाखूची लागवड करण्याची परवानगी द्या; सदाभाऊ खोतांचा पवारांना टोला
पक्षाच्या युवक आघाडीच्यावतीने पुण्याच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार तसेच कोरोना योद्ध्यांचा सन्मान आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना आठवले म्हणाले, ‘‘ मागील निवडणुकीत पुणे महापालिकेत भाजपसोबत राहुन महापालिकेत सत्ता मिळाल्यावर उपमहापौरपद आपल्याला मिळाले. येणाऱ्या निवडणुकीत आणखी चांगले काम करून सत्ता मिळवू.त्यानंतर जर अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्यास महापौरपदाची संधी ‘आरपीआयला’ दिले जाईल, असे आश्वासन देंवेद्र फडणवीस यांनी दिले आहे’’
चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली होती, आता पाय घसरू नये – नवाब मलिकांचा टोला
२०१४ च्या निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीबरोबर ‘आरपीआय’ने युती केली आहे. आठवले स्वत: केंद्रात गेली साडेसात वर्षे मंत्री आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ‘आरपीआय’ला सोबत घेऊन निवडणूक लढविली आहे. त्या निवडणुकीत भाजपाला माठे यश मिळाले. तब्बल ९९ नगरसेवक निवून आले.त्यात आरपीआयचा वाटा होता. पाच वर्षाच्या काळात आरपीआयला उपमहापौरपद मिळाले.भाजपाने दिलेला शब्द पाळला. आणखी सहा महिन्यांनी महापालिकेची निवडणूक आहे. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस महाविकास आघाीच्या माध्यमातून एकत्र लढणार आहेत.त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपाला गेल्यावेळीपेक्षा यावेळी ‘आरपीआयची’ अधिक गरज लागणार आहे.
Read Also :
- अजिबात टेंन्शन घेवू नका, महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येत नाही – राजेश टोपे
- मित्र असावा तर असा; माजी खासदार दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव
- ईडीची पुढची कारवाई काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने नांदेडमध्ये उडाली खळबळ
- व्हायरलं ऑडिओ क्लिप प्रकरण पडलं महागात; शिवसेनेतून रामदास कदमांचा पत्ता होणार कट?
- शिवसेना-राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला अन् सेना आमदाराच्या होर्डिंगवर थेट मोदींची फोटो लागला