मुंबई : आमच्यामध्ये हिंमत होती म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो होतो. भारतीय लोकशाहीमध्ये रात्री बारा वाजता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडले आणि दहशतवाद्यांना फाशी देण्याचं काम आमच्या सरकारच्या काळात झालं. आता कुणाच्या सरकारच्या काळात काय तयार झालं. त्या वादात मला पडायचं नाही. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याकुब मेमनच्या कबरीवरील सुशोभीकऱणाच्या मुद्द्यावर ते बोलत होते.
आदित्य ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांनी लावला, मानाच्या पहिल्या गणपतीच्या पालखीला हात
मुंबई बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांना कोण सुरक्षा पुरवत आहेत. ते आम्हाला माहिती आहे. त्यांचे काही सोबती अजूनही तुरूंगामध्ये आहेत. अशी प्रखर टिका देखील त्यांनी केला आहे. 1993 साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी याकुब मेननच्या कबरीवरून सध्या राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले आहे. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मात्र भाजपने आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“चिप पल्बिसिटीबद्दल आपण कुप्रसिद्ध आहात हे विसरू नका”; नवनीत राणांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
मुख्यमंत्री आणि आमच्या सरकारने पहिला निर्णय घेतला की आता जनतेला मोकळा श्वास घेऊ द्या. यावर्षीचा गणेश उत्सव हा ग्लोबल गणेश उत्सव साजरा होताना दिसत आहे, थायलंडच्या एका पर्यटन ग्रुपने मराठीतील आरती अस्सलखितपणे म्हटली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱी शिवसेना यांची युती जिल्हा परिषदांपासून ते लोकसभा अशा सर्व निवडणुकांसाठी असेल असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
“दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला”; भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, गणेश उत्सावादरम्यान एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीस देखील हजर होते. तसेच अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी रांग लावली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यानंतर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे आणि भाजपसोबत निवडणुका लढविणार का ? असा सवाल देखील याठिकाणी उपस्थित केला जात आहे.
Read also
- “ते दहीहंडी अन् गणेशोत्सवाच्या शुभेच्छा द्यायला देखील विसरले”; भाजपने ठाकरेंना पुन्हा डिवचलं
- शिंदे गट मनसेमध्ये विलीन होणार ? आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतिक्षा
- “गेल्या निवडणुकीत चंद्रकांत दादा थोडक्यात जिंकले”, आता पार्सल कोथरूड ते कोल्हापुर जाणार
- “बारामतीने देशाला नाही पण पवार कुटुंबाला विकासाची दिशा दाखवली”
- “इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना अन् विरोधक खोके दाखवताहेत”; शाहाजी पाटील