मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत आधीच्या प्रक्रियेप्रमाणेच केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा पुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच, 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. या निर्णयासाठी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहे.
पुन्हा राज्यांकडून जुन्या व्यवस्थेचा आग्रह होत असल्याने तीही जबाबदारी केंद्र सरकारने स्वत:कडे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केला. आता संपूर्ण लसींची खरेदी ही केंद्र सरकार करेल आणि जुन्याच व्यवस्थेनुसार राज्यांना ती मोफत दिली जाईल. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना मोफत लस प्राप्त होणार आहे. या निर्णयामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळेल, असे म्हणत फडणवीसांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
तसेच, प्रधानमंत्री गरिब कल्याण अन्न योजनेला आता दीपावलीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे सुमारे 80 कोटींहून अधिक नागरिकांना नोव्हेंबर 2021 पर्यंत मोफत धान्य मिळणार असल्याचे देखील फडणवीसांनी सांगितले.
दरम्यान, अनेक राज्यांच्या मागणीनंतर अखेर केंद्र सरकारचे राज्यांना लसीचा पुरवठा करणार आहे. आज पूर्ण जगात लशीची जी मागणी आहे, त्या तुलनेत उत्पादन करणाऱ्या कंपन्या मोजक्या आहेत, कमी आहेत. आता आपल्याकडे भारतात बनलेली लस नसती, तर आज भारतासारख्या मोठ्या देशात काय झालं असतं, विचार करा, असेही मोदी म्हणाले.
Read Also :