मुंबई : दिवाळीची सुरवात मलिकांनी लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. दिवाळी संपण्याची वाट पाहा. अंडरवर्ल्डशीसोबत मलिकांचे असलेल्या संबधांचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे, असे फडणवीस म्हणाले. त्याला राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक चांगलेच संतापले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या मंत्र्यांना पैसे खाण्याचे प्रशिक्षण देतो – गोपीचंद पडळकर
मलिक म्हणाले, देवेंद्र फडणवीस समीर वानखेडे तुमचा निकटवर्तीय आहे. त्याच्याकडून पंचनामा मागवा. माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडलं नाही. मी तो पंचनामा दाखवणार आहे. 14 जानेवारीला नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. माध्यमांची फसवणूक करण्यात आली. देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील आहात, तुमच्याकडं सनद आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत सहा महिन्यात चार्जशीट फाईल करायची असते. केस कमजोर करण्यासाठी आरोप प्रयत्न करत असल्याचा आरोप होतोय, मात्र चार्जशीट झाल्यानं केस कमजोर होण्याचा प्रश्न नाही. देवेंद्र फडणवीस माफी मागणार का?, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांवरील आरोपानंतर नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा, म्हणाले…
जनतेच्या प्रश्नावर राजीनामा एकदा नाहीतर शंभर वेळा द्यायला तयार असल्याचं नवाब मलिक म्हणाले. कोर्टाच्या आदेशाच्या अवमानप्रकरणी त्यावेळी राजीनामा दिले होता. मी 2008 ला पुन्हा मंत्री झालो. देवेंद्र फडणवीस यांना माझा थेट सवाल आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळाचं एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी नकली देवेंद्र शहरात कोण फिरतंय हा सवाल केला होता. तुमचा भाऊ शहरात काय करत होता याची माहिती दिली होती. आम्ही त्यावेळी सीसीटीव्ही दिलं असतं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा आरोप करताय. एखादा व्यक्ती, नेता अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करण्याऐवजी कारवाई करायला पाहिजे होती, असं नवाब मलिक म्हणाले.
Read Also :
- आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा
- तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका – अमृता फडणवीस
- मुळा एज्युकेशन संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये शिवसेना मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी
- अनिल देशमुखांनंतर पुढचा नंतर शिवसेना नेत्याचा; ‘त्या’ ट्विटमुळे उडाली खळबळ
- दुहेरी दणका: अनिल देशमुखांना अटक, अजित पवारांची १०० कोटीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश